गिल-कोहलीसह पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करणारे कर्णधार

गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी पर्वाची नवी सुरुवात

शुबमन गिलनं कसोटी संघाचे नेतृत्व करताना शतकी खेळीसह फलंदाजीतील धमक दाखवली. पण भारतीय संघाला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.

भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करणारा गिल हा काही पहिला भारतीय कर्णधार नाही. 

दिग्गज क्रिकेटर सीके नायडू यांनी १९३२ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध कॅप्टन्सीतील पहिलाच सामना गमावला होता.

मन्सुर अली पतोडी यांनी १९६२ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व केले. भारतीय संघाने हा सामना गमावला होता. 

दिलीप वेंगसरकर यांनी १९८७ मध्ये घरच्या मैदानात वेस्ट इंडिज विरुद्ध कॅप्टन्सीच्या पदार्पणातील सामना गमावला होता.

विराट कोहली २०१४ मध्ये पहिल्यांदा भारतीय कसोची संघाचे नेतृत्व करताना दिसला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या कॅप्टन्सीची सुरुवातही पराभवाने झालेली. 

इंग्लंडच्या मैदानात २०२२ मध्ये बुमराहाने पहिल्यांदा कसोटी संघाचे नेतृत्व केले. हा सामनाही भारतीय संघाने गमावला होता.