एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारे १० भारतीय फलंदाज

टेस्टमधील बेस्ट रेकॉर्ड! गिल ठरला टॉपर 

बर्मिंगहॅम कसोटीत पहिल्या डावातील द्विशतक अन् दुसऱ्या डावातील शतकासह गिल एका कसोटीत सर्वाधिक (४३०) धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.

या यादीत लिटल मास्टर सुनील गावसकर दुसऱ्या स्थानी आहेत. १९७१ मध्ये गावसकरांनी वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीत ३४४ धावा केल्या होत्या.

२००१ मध्ये व्हीव्हीएस लक्ष्मण याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कोलकाता कसोटी सामन्यात ३४० धावा केल्या होत्या.

२००७ मध्ये बंगळुरुच्या मैदानात पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात सौरव गांगुलीनं दोन्ही डावात मिळून ३३० धावा केल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नई कसोटीत  सेहवागनं ३१९ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय ३०९ धावासह तो या यादीत दोन वेळा दिसतो.

२००३ मध्ये द्रविडनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एडिलेड कसोटीत पहिल्या डावात २३३ आणि दुसऱ्या डावात ७२ धावांसह ३०५ धावा काढल्या होत्या.

या यादीत करूण नायरचाही समावेश आहे. २०१६ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध ३०३ धावांची खेळी केली होती.

माजी कसोटी कर्णधार रोहित शर्मा ३०३ धावांसह या यादीत असल्याचे दिसून येते. 

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.

Click Here
Click Here