कोच गंभीरचाही अंदाजही ठरला लक्षवेधी
इंग्लंड दौऱ्यावर जाताना कसोटी संघाचा उप कर्णधार रिषभ पंत एकदम स्टायलिश अंदाजात दिसला.
जसप्रीत बुमराहची झलकही एकदम कूल पण कडक अशी होती.
आयपीएल स्पर्धा गाजवल्यावर साई सुदर्शनही कसोटी संघातून छाप सोडण्यास तयार आहे.
इंग्लंड दौऱ्याआधी साखरपूडा उरकून कुलदीप यादवही इंग्लंडला रवाना झालाय.
रविंद्र जडेजावर इंग्लंड दौऱ्यावर मोठी जबाबदारी असेल. नंबर वन ऑलराऊंडर हा संघातील सर्वात अनुभवी खेळाडूपैकी एक आहे.
मोहम्मद सिराज यालाही इंग्लंड दौऱ्यावर संधी देण्यात आलीये. ऑस्ट्रेलिया दौऱ्याप्रमाणेच इथंही तो बुमराहाला उत्तम साथ देईल अशी अपेक्षा आहे.
टीम इंडियाच्या नव्या जर्सीत गौतम गंभीरची झलकही लक्षवेधी अशीच होती.