भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (ISS) उड्डाण केले. त्यांनी आपल्या 14 दिवसांच्या या मिशनसाठी आवश्यक साहित्यासोबतच गाजराचा हलवा आणि आंब्याचा रसही नेला आहे.
आता, अनेकांच्या मनात एक प्रश्न येत आहे, तो म्हणजे, अंतराळात अंतराळवीरांचे अन्न नेमके कसे असते? ते पृथ्वीप्रमाणेच अन्न खातात की, काही वेगळी पद्धत आहे, चला जाणून घेऊया...
पूर्वी अंतराळवीर अंतराळात जाताना 'बेबी फूड' घेऊन जात असत. मात्र आता, थर्मो-स्टेबलाइज्ड अर्थात कमी आर्द्रतेचे अन्नही खातात. यात्र यात पाणी घालून घेतले जाते.
अंतराळात काही पदार्थ पाण्यासह तर काही नैसर्गिकपणे खाल्ले जातात. तेथे प्रमाणातच आहार करण्याची परवानगी असते. हा आहार अंतराळवीराच्या वजनाप्रमाणे ठरवला जातो.
तेथे फळे, ब्राउनी, फ्रीज ड्राय पदार्थ खाऊ शकतात. आज काल, अंतराळात खाण्यासाठी रिहायड्रेटेड पदार्थांमध्ये चिकन कॉन्सोम, चीज, मॅकरोनी आणि स्क्रॅम्बल्ड एग्ज सारखे सूप समाविष्ट आहेत.
अंतराळवीरांचे अन्न पौष्टिक आणि चविष्ट असावे, याची खात्री केली जाते. ब्रेड, कोरडे मीठ, मिरपूड, कार्बोनेटेड पेये, अल्कोहोल आणि ताजी फळे आणि भाज्या यांसारख्या काही वस्तू सोबत नेता येत नाहीत.
अंतराळात ताज्या पाण्याची कमतरता आहे, यामुळे अधिक पाणी लागणार नाही आणि अधिक काळ टीकेल, असेच अन्न तेथे नेले जाते.
कसा असतो डायट प्लॅन? -जर एखादा अंतराळवीर, अंतराळात अधिक दिवस राहणार असेल तर, त्याचे वजन कमी होऊ नये, स्नायू आणि हाडे कमकुवत होऊ नयेत, म्हणून त्याचा आहारही त्यानुसार तयार केला जातो.