जाणून घ्या पंजाब किंग्जच्या कॅप्टनसंदर्भातील काही खास गोष्टी
भारताचा स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जच्या संघाने ११ वर्षांनी फायनल गाठलीये.
दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघानंतर श्रेयस अय्यरनं तिसऱ्या फ्रँचायझी संघाला फायनलमध्ये नेत इतिहास रचलाय.
एक नजर क्रिकेटच्या मैदानात खास छाप सोडणाऱ्या श्रेयस अय्यरचे नेटवर्थ अन् त्याच्याकडील महागड्या कार कलेक्शनसह काही खास गोष्टींवर
रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यरचे नेटवर्थ हे ६० ते ७० कोटींच्या घरात आहे. तो पंजाबच्या ताफ्यात सामील होण्याआधी हा आकडा ५० कोटींच्या घरात होता.
पंजाबच्या संघाने मेगा लिलावात श्रेयस अय्यरवर २६.७५ कोटी एवढी मोठी बोली लावली होती.
टीम इंडियासह आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडणारा श्रेयस अय्यर क्रिकेटशिवाय जाहिरातीच्या माध्यमातून मोठी कमाई करतो.
तो मुंबईतील अलिशान घराचा मालक आहे. त्याच्या घराची किंमत जवळपास २ कोटी ९० लाख इतकी आहे.
क्रिकेटर महागड्या कारचा देखील शौकीन आहे. त्याच्या गॅरेजमध्ये मर्सिडीज बेंज G63 AMG, लेम्बोर्गिनी हुराकन आणि ऑडी S5 सारख्या कारचा समावेश आहे.
त्याच्याकडील महागड्या घड्याळांमध्ये Omega Constellation Ref. 123.20.38.21.03.001 ची किंमत ७ लाखांहून अधिक आहे.