ही अभिनेत्री निघाली श्रेयस अय्यरची 'दिवानी'! म्हणे, मी मनातल्या मनात...

ती नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या सविस्तर

श्रेयस अय्यर पंजाब किंग्जच्या संघाला चॅम्पियन करण्यात अपयशी ठरला तरी संघ मालकीण प्रीती झिंटासह चाहत्यांनी त्याच्या नेतृत्वातील कर्तृत्वाला दाद दिलीये.

आता श्रेयस अय्यरसंदर्भात बिग बॉस १८ फेम अभिनेत्री एडिन रोझ हिने आपल्या मनातील भावना व्यक्त करत सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. 

filmygyan ला दिलेल्या मुलाखतीत तिने श्रेयस अय्यरबद्दल मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

क्रिकेटर श्रेयस अय्यरवर प्रेम व्यक्त करताना ती म्हणालीये की, मी तर मनातल्या मनात त्याच्याशी लग्न उरकूनही मोकळी झालीये. 

फक्त लग्नाचा मुद्दा बोलून ती थांबली नाही तर मनातल्या मनात मी स्वत:ला क्रिकेटच्या मुलांची आई असल्याच्या दुनियेत जगते, असेही ती म्हणालीये. 

तो उंच अन् हँडसम आहे. बियर्ड लूक आणि परफेक्ट मसल यामुळे तो मला परफेक्ट पार्टनर वाटतो, असेही तिने या मुलाखतीत सांगितले आहे.

तो भारतीय संघाचे प्रतिनीधीत्व करतो. माझ्या वडिलांप्रमाणे तोही दक्षिण भारतातून येतो. मी लग्नासाठी क्षणात होकार देईन, असेही ती म्हणालीये. 

Click Here