२६ एप्रिल २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे. या दिवशी नेमके काय करावे? पाहा
चैत्र वद्य त्रयोदशीला श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतारकार्याची सांगता केली. यंदा २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी म्हणजेच स्मरण दिन आहे.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे.
स्वामी महाराजांनी अवतारकार्यात अनेक लीला केल्या. अनेकांचा उद्धार केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. अनेक उत्तमोत्तम दैवी शिष्यगण घडवले.
आजही अनेकांना स्वामी महाराजांच्या कृपेचा अद्भूत अनुभव येतो. स्वामी समर्थ महाराजांच्या स्मरण दिनाच्या निमित्ताने स्वामी चरित्रामृत, गुरुलीलामृत याचे पारायण केले जाऊ शकते.
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी स्मरण दिनाला मनापासून सेवा करावी. स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगांच्या फुलांचा समावेश करावा.
स्वामींना पिवळ्या रंगांचे पेढे अर्पण करावेत आणि प्रसाद म्हणून वाटावेत. तसेच नैवेद्य दाखवताना स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.
स्वामी महाराजांच्या स्मरण दिनी शक्य असेल, त्या गोष्टींचे दान करा. यामध्ये पिवळ्या रंगांच्या गोष्टींचा समावेश असल्यास सर्वोत्तम.
शक्य असेल तर स्वामींच्या मठात जावे. जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. आता करत असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी.