दुर्गाष्टमी: ७ कामे करा,लक्ष्मीकृपा करेल

०१ ऑगस्ट २०२५ रोजी दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी दुर्गाष्टमी आहे.

श्रावण मास सुरू असून, ०१ ऑगस्ट २०२५ रोजी दुसऱ्या श्रावण शुक्रवारी दुर्गाष्टमी, दुर्वाष्टमी आहे. 

धन, वैभवाची देवता म्हणून लक्ष्मी देवीचे पूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाने घरात सुख-समृद्धी, धन-दौलत येते, अशी मान्यता आहे. 

लक्ष्मी देवीचे आवडते फूल, आवडता नैवेद्य तसेच अन्य आवडत्या वस्तू अर्पण केल्यास लक्ष्मी प्रसन्न होते, असे म्हटले जाते. 

लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचे काही उपाय सांगितले जातात. हे उपाय केल्यास घरात समृद्धता येऊ शकेल, असे म्हटले जाते.

तिन्हीसांजेला दिवेलागणीला लक्ष्मी देवी संचार करते. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार टापटीप. स्वच्छ ठेवावे. स्वच्छ, सुंदर घरात लक्ष्मीचा वास असतो, असे म्हटले जाते.

घरातील देवघरात अंधार असू नये. देवघरात दिवा तेवत ठेवावा. अशाने लक्ष्मी देवी प्रसन्न होते, असे म्हटले जाते.

उत्तर दिशा ही कुबेराची मानली जाते. उत्तर दिशा स्वच्छ ठेवावी. असे केल्याने लक्ष्मी देवीसह कुबेराची कृपा प्राप्त होते.

घरातील केरसुणी योग्य ठिकाणी आणि सुस्थितीत ठेवावी. केरसुणीचा अपमान करू नये. अन्यथा लक्ष्मी देवीचा अपमान होतो.

रात्री योग्य दिशेला झोपावे. दक्षिणेला पाय करून झोपू नये, असे सांगितले जाते. 

घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव जाणवत असेल, तर रात्री सर्व कामे आटोपल्यावर स्वयंपाकघरात कापूर आणि लवंग एकत्र करून धूप करावा. 

रात्रीनंतर देवघराजवळ निर्माल्य तसेच ठेवू नये. देवघर स्वच्छ ठेवावे, असे सांगितले जाते. 

- सदर माहिती सामान्य मान्यतांवर आधारित आहे. तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल.

ऑगस्टमध्ये 'या' राशींना राजयोग

Click Here