मासिक पाळीच्या काळात केस धुवावेत की नाही याच्याविषयीदेखील अनेक मतमतांतरे आहेत.
मासिक पाळीविषयी आजही आपल्याकडे अनेक समज-गैरसमज आहेत.
पिरिअड्स आल्यानंतर या काळात काय करावं, काय करु नये याचे ही काही नियम घालून देण्यात आले आहेत.
अनेकदा हे नियम अवाजवी आणि निर्थक वाटतात. मात्र, तरीदेखील वर्षोनुवर्ष स्त्रिया या नियमांचं पालन करत आहेत.
अनेकांच्या मते, मासिक पाळीच्या काळात केस धुवून नयेत. पण, खरंच या काळात केस धुणं चुकीचं आहे का ते पाहुयात.
मासिक पाळीच्या काळा स्त्रियांनी स्वत:च्या शरीराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
या काळात शारीरिक स्वच्छतेशी कधीही तडजोड करु नये. तसंच या काळात केस धुवू नये वा अंघोळ करु नये असं सांगणारे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.