हिवाळ्यात दही खावे का? 

आपल्या रोजच्या जेवणात दही खाण्याची सवय असते. पण हिवाळ्यात दही खाणं आरोग्यासाठी सुरक्षित आहे का जाणून घेऊया. 

हिवाळ्यात वातावरणातील बदलामुळे शरीर कमकुवत होते. अनेकदा या काळात काही पदार्थ खाणे टाळायला हवे, ज्यात दह्याचा समावेश असतो. 

हिवाळ्यात किती प्रमाणात दही खायला हवे जाणून घेऊया. 

हिवाळ्यात दही खाणं फायदेशीर आहे. कारण यात चांगले बॅक्टेरिया असतात जे शरीराला रोगांशी लढण्यास मदत करतात. 

दिवसातून एक वाटी दही खाणे आरोग्यासाठी चांगले असते. 

फ्रीजमधले दही खाऊ नका. थोडे गरम झाल्यानंतर खाणं केव्हाही चांगलं. 

आयुर्वेदानुसार हिवाळ्यात दही रात्रीऐवजी दिवसा खायला हवे. 

सर्दी, खोकला, घसा खवखवणे किंवा कफ येत असेल तर दही खाणं टाळावं, ज्यामुळे कफ देखील वाढू शकतो. 

Click Here