काही जण चहाप्रेमी असतात. त्यामुळे ते कोणत्याही वेळी चहा प्यायला तयार असतात.
आपल्यापैकी अनेकांची सकाळची सुरुवात ही एक कप चहाने होते. यात काही जण चहाप्रेमी असतात. त्यामुळे ते कोणत्याही वेळी चहा प्यायला तयार असतात.
अनेकांना जेवण झाल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. परंतु, जेवणानंतर लगेच चहा पिणं योग्य की अयोग्य ते समजून घेऊयात.
चहा प्यायल्यामुळे थकवा दूर होतो आणि तरतरी येते. मात्र, चहा पिण्याचीही एक योग्य वेळ असते.
जेवणानंतर लगेच चहा प्यायला तर हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. चहामध्ये कॅफेन असतं ज्यामुळे ब्लडप्रेशर वाढतं.
जेवणानंतर लगेच चहा घेतला तर हृदयाचे ठोके वेगवान होतात. त्यामुळे हृदयाची समस्या निर्माण होऊ शकते.
जेवणानंतर लगेच चहा प्यायल्याने पचनसंस्था कमकुवत होते, ज्यामुळे अन्न नीट पचत नाही. परिणामी गॅस, अॅसिडिटीची समस्या निर्माण होते.
जेवल्यानंतर चहा प्यायल्याने डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते.