प्रॉपर्टी खरेदी करताना ही कागदपत्रं तपासली?

आपण संपूर्ण आयुष्यातील बचत घर किंवा मालमत्ता खरेदी करण्यात खर्च करतो. त्यापूर्वी महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्रे तपासली पाहिजेत.

लोक त्यांच्या संपूर्ण आयुष्यातील बचत घर किंवा मालमत्ता खरेदी करण्यात खर्च करतात. अशा परिस्थितीत, मालमत्ता खरेदी करताना, तुम्ही अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे तपासली पाहिजेत.

यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारचा कायदेशीर त्रास आणि वाद टाळता येईल. तुम्हालाही जर नवीन घर घ्यायचं असेल तर पुढील माहिती नक्की घ्या...

सेल डीड : विक्रेत्याकडे ओरिजनल विक्री करार आहे आणि त्यात मालमत्तेची संपूर्ण माहिती आहे याची खात्री करा. मालमत्तेच्या मागील मालकांची साखळी देखील तपासली पाहिजे.

टायटल डीड : हा मालमत्तेचा मालकी हक्क पुरावा आहे. मालकी हक्कपत्र स्वच्छ आणि कोणत्याही कायदेशीर वादांपासून मुक्त असल्याची खात्री करा.

मदर डीड : हे मालमत्तेच्या मागील मागील सर्व व्यवहारांची नोंद आणि मालमत्तेची मालकी सध्याच्या विक्रेत्याकडे कशी गेली हे दर्शवतं.

उत्तराधिकार प्रमाणपत्र : जर मालमत्ता वारसाहक्कानं मिळाली असेल तर हे प्रमाणपत्र आवश्यक आहे. 

मृत्युपत्र : जर मालमत्ता मृत्युपत्राद्वारे हस्तांतरित केली असेल, तर मृत्युपत्राची तपासणी महत्त्वाची आहे.

'श्रीमंत' बनेल तुमचं मूल, या ६ मार्गांनी 'सुरक्षा कवच' तयार करा; महागाई देखील मार्ग अडवू शकणार नाही

Click Here