अनेकदा भिंतींना रंग देतांना तो जमिनीवर सांडतो.
सणवार आले की प्रत्येकाच्या घरी उत्साहाचं वातावरण असतं. यामध्येच सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते घराच्या रंगरंगोटीचं.
सणावाराच्या दिवशी आपलं घर छान उजळून निघावं यासाठी अनेक जण घरात रंगरंगोटी करतात. परंतु, अनेकदा भिंतींना रंग देतांना तो जमिनीवर सांडतो.
जमिनीवर सांडलेला हा रंग कसा स्वच्छ करायचा याच्या काही टिप्स पाहुयात. या टिप्स युट्यूबर शोभा बैंसला यांनी दिल्या आहेत.
जमिनीवर पडलेल्या डागांवर थिनर टाका आणि १०-२० मिनिटे ते तसंच ठेवा. यामुळे रंग पातळ व्हायला लागतो
रंग पातळ झाल्यावर चमचा किंवा टोकधार वस्तूने सांडलेला रंग हळूहळू खरवडा.यामुळे सांडलेला रंग सहज निघेल.
बऱ्याचदा जमिनीवरील रंग निघाल्यानंतरही त्याचे डाग तसेच राहतात. यासाठी त्याजागी शॅम्पू टाका आणि जमिनी स्वच्छ पुसून घ्या.
शॅम्पूमुळे रंगाचा डाग आणि थिनरचा उग्रवास दोन्ही नाहीसे होतील.