या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे शिवाली परब हे नाव घराघरात पोहोचलं. या कार्यक्रमाने तिला नवीन ओळख मिळवून दिली.
कल्याणची चुलबुली म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या शिवालीनं नुकतंच तिचा एक सुंदर लूक शेअर केला आहे.
शिवालीने गडद जांभळ्या रंगाचा अत्यंत आकर्षक ड्रेस परिधान केला. तिच्या ड्रेसवरील झळाळती डिझाईन खास उठून दिसली.
या लूकसाठी तिने आपले केस मोकळे सोडले, जे तिच्या पारंपरिक लूकला साजेसे आहेत. यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.
शिवालीने हलका आणि नैसर्गिक मेकअप केला आहे, ज्यामुळे तिचा लूक सोज्वळ असा दिसला.
मोठे झुमके, गोंडस हसणं लक्ष वेधून घेतो. प्रत्येक फोटोमध्ये तिचा आत्मविश्वास जाणवतो आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
शिवाली परब ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. त्यामाध्यमातून आपले फोटो, व्हिडीओ यांच्यासह महत्वाच्या अपडेट्स चाहत्यांना देते.