नवरदेवासाठी शेरवानी खरेदी करताय? 'या' गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष
या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही तर लग्नात तुमचंच होईल हसू
सध्याच्या काळात लग्न करणं म्हणजे एक प्रकारचा ग्रँड इव्हेंटचं झाला आहे.
नववधूप्रमाणेच नवरदेवही त्याच्या लूकच्या बाबतीत चोखंदळ झाले आहेत. म्हणूनच, लग्नात शेरवानी घेतांना मुलांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं ते समजूयात.
शेरवानी घेतांना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे फिटिंग. जर तुमची फिटिंग चुकली तर लग्नात तुमचं हसू झालं समजा.
तुमच्या शरीरयष्टीनुसार शेरवानीची निवड करा. एकदम लूज किंवा एकदम घट्ट शेरवानी कधीही घेऊ नका.
शेरवानी घेतांना योग्य रंगाची निवड करा. साधारणपणे, गोल्डन, क्रीम आणि पांढरा हे एव्हरग्रीन कलर आहेत. आजकाल मुलंदेखील पेस्टल कलरच्या शेरवानींना पसंती देत आहेत.
शेरवानी घेतांना कापडाच्या क्वालिटीकडे खासकरुन लक्ष द्या. जर हलक्या क्वालिटीचं कापड घेतलं तर ऐन लग्नात कुठेतरी अडकून फाटू शकतं. त्यामुळे चांगली क्वालिटी गरजेची.
शेरवानीमध्ये सध्या अनेक नवनवीन प्रयोग केले जात आहेत. यात हेवी वर्कपासून नाजूक नक्षीकाम करण्यापर्यंत अनेक नव्या गोष्टी पाहायला मिळतात.