'काटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचा ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
तिच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबीय आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. तर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
शेफाली जरीवालाला काटा लगा या गाण्याने प्रसिद्धी मिळवून दिली होती. तिने काही मालिका, सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही काम केलं होतं.
'बुगी वूगी', 'नच बलिए', 'बिग बॉस' अशा रिएलिटी शोमध्ये तिने सहभाग घेतला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, शेफाली जरीवाला कोट्यवधींची मालकीण होती. तिच्याकडे १ मिलियन डॉलर इतकी संपत्ती होती.
म्हणजेच भारतीय रुपयानुसार, शेफालीच्या नावावर ७.५ कोटींची संपत्ती आहे.
एका शोसाठी शेफाली १० ते २५ लाख रुपये इतकं मानधन घेत होती.