सिव्हिल इंजिनीअर व्हायचं होतं, पण...
मराठी कुटुंबात जन्मलेल्या शर्वरी वाघनं बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे.
शर्वरी ही महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कन्या नम्रता यांची लेक आहे.
शरवरीने मुंबईतील दादर पारसी यूथ्स असेंब्ली स्कूलमधून शालेय शिक्षण घेतलं आणि रुपारेल कॉलेज, मुंबई येथून B.Sc. पदवी पूर्ण केली.
तिला सुरुवातीला सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचं होतं. पण अभिनयात आवड असल्यामुळे तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
अभिनयात येण्याआधी तिने 'बाजीराव मस्तानी', 'प्यार का पंचनामा २' यांसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं.
शर्वरीने जेफ गोल्डनबर्ग स्टुडिओमधून अभिनयाचे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे.
'बंटी और बबली २'मधून तिने बॉलिवूड डेब्यू केला आणि अलीकडेच तिचा "मुंज्या' सिनेमातील अभिनय विशेष गाजला.
शर्वरी लवकरच आदित्य चोप्राच्या 'अल्फा' या सिनेमांमध्येही झळकणार आहे.