गरबा नाईट्सला खासकरुन तरुण मंडळी त्यांच्या लूक्सकडे विशेष लक्ष देत असतात.
नवरात्रोत्सव लवकरच सुरु होत आहे. त्यामुळे तरुणाईला वेध लागलेत ते गरबा-दांडिया नाईट्सचे.
गरबा खेळतांना कायमच घाम येतो. परिणामी, चेहऱ्यावरील मेकअप खराब होतो.म्हणून, घामामुळे मेकअप खराब होऊ नये यासाठी काही टीप्स पाहुयात.
घामामुळे मेकअप खराब होऊ नये असं वाटत असेल तर चांगल्या प्रतीचं प्रायमर चेहऱ्यावर लावणं गरजेचं आहे.
मेकअप दीर्घ काळ टिकवण्यासाठी कायम लाइट बेसचा वापर करावा.
घामामुळे कायमच डोळ्यामधील काजळ पसरतं. त्यामुळे या दिवसांत वॉटर प्रूफ काजळाचा वापर करावा.
सध्या बाजारात अनेक नवनवीन लिपस्टीक्स पाहायला मिळतात. परंतु, गरबा खेळतांना आवर्जुन मॅट लिपस्टिकचीच निवड करा.