पैसे कमवायचे? सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कंपनीचा येतोय IPO

एका लॉटमध्ये असणार ७५ शेअर्स, जाणून घ्या कधी येणार आयपीओ?

गेल्या काही वर्षांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे वळलेल्यांची संख्या वाढली आहे. अनेकजण आयपीओमधून झटपट कमाई करतात.

अनेकदा आयपीओच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक काही काळाने चांगला परतावा मिळवून देते. त्यामुळे यात इच्छुक असणारे गुंतवणूकदार आयपीओवर नजर ठेवून असतात.

आता सोन्याचे दागिने तयार करणारी कंपनी आयपीओ घेऊन येत आहे. कंपनीने ३६० कोटींच्या आयपीओसाठी १८९ ते १९९ रुपये प्रति शेअर प्राईस बॅण्ड निश्चित केला आहे.

शांती गोल्ड इंटरनॅशनल असे या कंपनीचे नाव आहे. २५ जुलै २०२५ रोजी कंपनीचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल आणि २९ जुलै रोजी बंद होणार आहे.

शांती गोल्ड इंटरनॅशनलच्या आयपीओमध्ये एका लॉटमध्ये ७५ शेअर असणार आहे. त्यासाठी १४,१७५ रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

मुंबई स्थित असलेल्या शांती गोल्ड इंटरनॅशनल कंपनी सर्व प्रकारचे सोन्याचे दागिने तयार करण्याचे काम करते. 

नाविन्यपूर्ण दागिन्यांचे डिझाईन तयार करणे, त्यांचे उत्पादन करणे यासाठी ही कंपनी ओळखली जाते. कंपनी दागिने निर्मिती क्षमता वर्षाला २,७०० किलोग्राम इतकी आहे.

टीप - ही आयपीओबद्दलची माहिती आहे. गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हे ८ संकेत तुम्हाला नोकरी बदलण्याची वेळ देतात

Click Here