कुलूप नाही, दार नाही बँकाही तशाच !

घराबाहेर पडल्यावर दार लागलंय ना नीट? कुलूप नीट लावलं ना?  याचं टेन्शन नेहमीच असंत. पण चक्क या गावात घरांनाच काय, तर बँकानाही कुलूप, दार काहीच नाही. 

सध्याच्या काळात जरा कुठे नजर चूक झाली की कशाचाच भरवसा नाही. वस्तू चाेरी हाेण्याची भीती, सगळ्या गाेष्टी बंदिस्त ठेवण्याकडे आपले लक्ष असते. 

पण, महाराष्ट्रात असं एक गाव आहे, जिथल्या लाेकांना चाेरीचं टेन्शनच नाही, इथल्या बँकाचेही दरवाजे सताड उघडे असतात, पण इथे चाेरीच हाेत नाही. 

महाराष्ट्रातल्या शनि शिंगणापूर गावात चाेरीचे टेन्शन काेणालाच नाही, कारण इथे चाेरी करण्याची काेणाची हिंमतच हाेत नाही. याला कारणही तसं खास आहे. 

शनि शिंगणापूरचे रक्षण स्वतः शनि देव करतात, असा विश्वास या गावकऱ्यांचा आहे, त्यामुळे इथे चाेरी करण्याचा विचारही काेणाच्या मनाला शिवत नाही. 

फार वर्षांपूर्वी खूज जाेरदार पाऊस या गावात झाला, त्यावेळी या गावातल्या लाेकांना एक काळ्या रंगाची शिळा सापडली. 

शिळा सापडली त्या रात्री गावच्या मुख्य व्यक्तीच्या स्वप्ना शनि देव आले. माझे मंदिर बांध असे शनिदेवाने त्यांना स्वप्नात सांगितले. 

असं सांगण्यात येतं की, शनि देवांनी सांगितले आहे, या गावाचे रक्षण मी स्वत: करणार. यामुळे या गावातले लाेक निर्धास्त राहतात. 

Click Here