राज्यातील सर्वात मोठा एक्स्प्रेस वे ठरणार, पहा कोणती देवस्थाने...
राज्य मंत्रिमंडळाने मंत्रिमंडळ बैठकीत नागपूर ते गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पासाठी 86,300 कोटी रुपये खर्च येणार असून सध्या २० हजार कोटी मंजूर झाले आहेत.
या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे अंतर ८-१० तासांवर येणार आहे. समृद्धी महामार्गानंतरचा राज्यातील सर्वात मोठा महामार्ग असणार आहे.
802 किमीचा हा सहा लेनचा मार्ग असणार आहे. या मार्गात जवळपास १० महत्वाची देवस्थाने जोडण्यात येणार आहेत.
या महामार्गाद्वारे महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजा भवानी (धाराशिव) आणि पत्रादेवी (गोवा) या तीन शक्तीपीठे जोडली जाणार आहेत.
याशिवाय औंढा नागनाथ (हिंगोली) आणि परळी वैजनाथ (बीड) ही दोन ज्योतिर्लिंगे जोडली जाणार आहेत.
विठ्ठल-रुक्मिणीचे स्थान पंढरपूर देखील या मार्गाद्वारे जोडले जाणार आहे.
याचसोबत शक्तीपीठ महामार्ग अंबाजोगाई, अक्कलकोट, गाणगापूर आणि नरसोबाची वाडी ही देवस्थानेही जोडली जाणार आहेत.
हा शक्तीपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापुर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून जाणार आहे.