रात्रीच्या अंधारात कधी समुद्र किनाऱ्यावर असताना, अचानक लाटा निळ्या - हिरव्या प्रकाशात चमकताना पाहिल्या आहेत का?
रात्रीच्या काळाेखात समुद्राचे पाणी दिसत नाही. पण, अचानक चमकायला लागते. यालाच यालाच Bioluminescence म्हणतात.
समुद्रातील सूक्ष्म जीव, प्लँक्टन, काही मासे व जेलीफिश हिरवा, निळा प्रकाश तयार करतात. शरीरात रासायनिक प्रतिक्रिया करून प्रकाश सोडतात.
Bioluminescence = bio (जीव) + luminescence (प्रकाश). हा नैसर्गिक प्रकाश सूर्य किंवा चंद्राच्या प्रकाशाशिवाय निर्माण होतो.
समुद्री जीव शरीरात luciferin नावाचं रसायन luciferase एन्झाइमशी प्रतिक्रिया करतं आणि प्रकाश तयार होतो.
हा प्रकाश नेहमी निळा-हिरवट असतो कारण समुद्रात तो रंग सर्वात जास्त पसरतो.
समुद्रातील लहान copepods, डिनोफ्लॅजलेट्स (plankton), काही स्क्विड्स, जेलीफिश, खोल समुद्रातील मासे हे सर्व चमकू शकतात.
Bioluminescence मुळे शत्रूपासून बचाव हाेताे, शिकार आकर्षित करता येते, एकमेकांना सिग्नल देतात.
पृथ्वीवरील काही ठिकाणी समुद्रातील लाटा इतक्या सुंदर चमकतात की पर्यटकांसाठी तो स्वर्गीय अनुभव असतो. मालदीव, गोवा (मोरेम, बेताळबातीम).
रात्री हलक्या लाटांवर पाय टाकला की पाण्यातून निळसर प्रकाश झळकतो. हा क्षण पाहणं म्हणजे जणू तारे समुद्रात उतरलेत असं वाटतं.