देशात बदलत्या, अनियमित झालेल्या जीवनशैलीमुळे फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढते आहे. फॅटी लिव्हरपासून दूर राहण्यासाठी 'हे' बदल नक्की करा.
खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि वेळा, व्यायामाचा अभाव, अनियमित जीवनशैली या कारणांमुळे लाेकं या आजाराचे बळी पडत आहेत.
डायबिटिस, काॅलेस्ट्राॅल नियंत्रणात नसणे, लठ्ठपणा याचा परिणामही लिव्हरवर हाेताे. प्राथमिक स्थितीत फॅटी लिव्हरची लक्षणे दिसून येत नाही.
फॅटी लिव्हरपासून दूर राहायचे असल्यास तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल केल्यास, फॅटी लिव्हर या आजारापासून तुमची सुटका हाेऊ शकते.
सकाळी व्यवस्थित नाश्ता करा, दुपारचे जेवण वेळेत करा, रात्री हलका आहार घ्या. रात्रीचं जेवण सायंकाळी सातच्या आत करा.
खूप प्रमाणात खाणं टाळा. तळलेले, प्रक्रिया केलेले पॅक फूड खाणे टाळा.
नेहमीच्या आहारात पांढरा ब्रेड, पास्ता सारखे पदार्थ जास्त प्रमाणात सेवन करू नका. अन्नात अधिक साखर घालणे टाळा.
नियमित व्यायाम करा. चालणे, धावणे, कार्डिओ अशा प्रकारचे व्यायाम केल्याने आराेग्य सुधारण्यास मदत हाेते.
फॅटी लिव्हर या आजारापासून सुटका करून घ्यायची असल्यास जीवनशैली आणि खाण्यात याेग्य ते बदल केले पाहिजेत.