याेग साधना सुरू करण्याआधी आणि नंतर शवासन करणे आवश्यक आहे. शवासन केल्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
शवासन म्हणजे पाठीवर झाेपून हात शरीराच्या दाेन्ही बाजूला, तळवे वरच्या दिशेला ठेवून डाेळे बंद करा. शरीर शिथील साेडून श्वासावर लक्ष केंद्रित करा.
शवासन म्हणजे पूर्ण विश्रांतीची अवस्था. पूर्ण जागरूक अवस्थेत शरीराला शिथील ठेवून श्वासावर लक्ष केंद्रित करणे.
दिवसभराच्या गडबडीने मनं, शरीर थकलेलं असतं. शवासनामुळे शरीर आणि मनं रीसेट हाेण्यास मदत हाेते. मनं - शरीर एकत्र येते.
याेग करण्यासाठी मनं शांत, शरीर सैल आणि श्वास नियंत्रित करण्यासाठी शवासन मदत करते.
जसं एखादं मशीन चालू करताना थंड हाेऊ द्यावं लागतं. त्याचप्रमाणेच शवासन याेग करण्यासाठी मनं आणि शरीराला शांत करते.
याेग केल्यावर शरीरात उर्जा निर्माण हाेते. शवासन केल्यानंतर उर्जेला याेग्य ठिकाणी नेण्यासाठी शवासन उपयुक्त ठरते.
याेग केल्यावर शरीर थाेडं थकलेलं असतं. शवासनामुळे शरीराला विश्रांती मिळते, आणि पुन्हा काम करण्याची उत्साह मिळताे.
शवासन केल्याने मनं शांत हाेतं, एकाग्रता वाढते, तणाव कमी हाेताे. अंतर्मुख हाेण्याचा मार्ग माेकळा हाेताे.
याेग साधना सुरू करण्याआधी आणि झाल्यावर फक्त ५ मिनीटं शवासन नक्की करा आणि तुमच्यातले हे फरक नक्की अनुभवा.