सर्फराजच्या weight loss चं सिक्रेट ग्रीन कॉफी खरंच आहे प्रभावी? 

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खाननं नुकतंच बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं.

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खाननं नुकतंच बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं. त्यानं जवळपास १० ते १३ किलो वजन घटवलंय. 

त्यानं हे कमी कालावधीत केलेलं वेट लॉस पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं असून त्याच्या डाएट प्लॅनबाबत अधिकच उत्सुकता वाढली आहे. 

सर्फराज खाननं आपल्या आहारात बदल करून ग्रीन कॉफीचं सेवन सुरू केलं होतं

त्यामुळं वेट लॉससाठी धडपडणाऱ्यांमध्ये सध्या ग्रीन कॉफीबाबत प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. मात्रं खरंच ग्रीन कॉफी वजन घटवण्यास मदत करते? 

काही वैद्यकीय चाचण्यांनुसार ग्रीन कॉफीच्या बियांच्या अर्कात क्लोरोजेनिक अॅसिड मोठ्या प्रमाणात आढळून आलं आहे. याचा फायदा वजन घटवण्यात होतो. 

२०२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार ग्रीन कॉफीच्या अर्कामध्ये रक्तदाब, कॉलेस्ट्रॉल, ट्रॅयग्लासेराईड आणि फास्टिंग ग्लुकोजचा स्तर कमी करण्याची क्षमता आहे. 

ग्रीन कॉफीमधील क्लोरोजेनिक अॅसिड ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढण्यात मदत करते. याचबरोबर शरिरातील सूज कमी करून डीएनए डॅमेज होण्यापासून देखील संरक्षण देते. 

काही अभ्यासात ग्रीन कॉफीच्या सेवनामुळं त्वचेचं देखील आरोग्या सुधारतं असा दावा करण्यात आला आहे. 

मात्र असं असलं तरी ग्रीन कॉफीमुळं खरंच वजन कमी करण्यासाठी मदत होते का याबाबत अजून सविस्तर अभ्यास होणं गरजेचं आहे. 

Click Here