सारा जमाना.... सारा का दिवाना...

सारा तेंडुलकरची क्वीन्सलँडमध्ये धमाल-मस्ती

जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची लेक सारा तेंडुलकर तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते.

गेल्या काही दिवसांपासून सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियात व्हेकेशन एन्जॉय करत मॉडेलिंग करताना दिसत आहे.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये सारा तेंडुलकर तिची खास मैत्रीण ग्रेस हेडन हिच्यासोबत पर्यटनाचा आनंद घेतेय.

सारा आणि ग्रेस क्वीन्सलँडच्या समुद्रकिनाऱ्यांपासून ते शॉपिंग स्ट्रीटपर्यंत सर्व जागा एक्स्पोलर करताना दिसताहेत.

सारा तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती ग्लॅमरस दिसत आहे.

साराने आपल्या क्वीन्सलँडच्या सुटीदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिली आणि खूप धमाल मजा मस्ती केली.

एका फोटोमध्ये सारा क्वीन्सलँडच्या शॉपिंग स्ट्रीटवर फास्ट फूड स्टॉलवर फ्रूट ज्यूसचा आस्वाद घेताना दिसली.

याशिवाय, साराने क्वीन्सलँडच्या नयनरम्य अशा समुद्रकिनाऱ्यावर खास मोटर रायडिंगचाही आनंद लुटला.

सारा तेंडुलकरच्या या सुंदर फोटोंना चाहत्यांकडूनही भरभरून प्रेम मिळत असल्याचे दिसत आहे.

Click Here