मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही कायम विविध कारणांमुळे चर्चेत असते.
गेल्या काही वर्षात ती केवळ सचिनची लेक म्हणून नव्हे तर एक फॅशन मॉडेल म्हणून चर्चेत आली आहे.
सारा आपल्या सौंदर्याने आणि फिटनेसने फॅशन इंडस्ट्रीमध्ये हळूहळू आपले स्थान निर्माण करत आहे.
ऑस्ट्रेलियातील पर्यटनवाढीसाठी सारा तेंडुलकरला भारतातील ब्रँड अम्बेसेडॉर बनवण्यात आले आहे.
याशिवाय, सारा तेंडुलकर गेल्या दीड-दोन वर्षात मोठ्या प्रमाणावर विविध ब्रँडच्या जाहिरातीही करतेय.
साराने एका खास ब्रँडसाठी ताजं फोटोशूट केलंय. या फोटोशूटमध्ये तिने पांढरा बॉडीकॉन ड्रेस परिधान केलाय.
लूक अधिक उठावदार करण्यासाठी तिने कानात डायमंड इअररिंग्स आणि हातात गोल्डन क्लच घेतला आहे.