खूपच कमी वयात तिने मोठी प्रसिद्धी कमावली आहे.
मोहित सुरी दिग्दर्शित 'सैयारा' चित्रपटातून अभिनेत्री अनीत पड्डाने प्रसिद्धी मिळवलीये.
'सैयारा' चित्रपटातून तिनं मोठा चाहतावर्ग मिळवला आहे.
अनित सोशल मीडियावरदेखील खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे नवे फोटो शेअर करत राहते.
अनीत अमृतसरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येते.
अनितने तिचे प्राथमिक शिक्षण अमृतसरमध्येच पूर्ण केले. त्यानंतर तिनं दिल्ली विद्यापीठामधून राज्यशास्त्रात बीए केले.
१४ ऑक्टोबर २००२ रोजी जन्मलेली अनित आज २२ वर्षांची आहे.
अनीतने यापूर्वी "सलाम वेंकी" या चित्रपटात एक छोटी भूमिका केली होती.
तसेच तिनं "बिग गर्ल्स डोन्ट क्राय" या वेब मालिकेत मुख्य भूमिका केली होती.