'सैराट' सिनेमा केला तेव्हा रिंकूचं वय किती होतं ते तुम्हाला माहितीये का?
रिंकू राजगुरू ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. 'सैराट'मधील आर्चीने तिला लोकप्रियता मिळवून दिली.
पण, 'सैराट' सिनेमा केला तेव्हा रिंकूचं वय किती होतं ते तुम्हाला माहितीये का?
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळेंच्या 'सैराट' सिनेमाने वर्ल्ड रेकॉर्ड केला.
सिनेमात दाखवलेल्या बिनधास्त आणि बुलेटवरुन येणाऱ्या आर्चीने सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली.
'सैराट' सिनेमात दाखवलेली आर्ची वयाने मोठी असली तरी त्यावेळी रिंकू मात्र शाळेत होती.
'सैराट' सिनेमात काम केलं तेव्हा रिंकूचं वय फक्त १५ वर्ष इतकं होतं.
पण, 'सैराट' सिनेमामुळे रिंकूच्या आयुष्याला मात्र कलाटणी मिळाली.