पुन्हा प्रयत्न.... सायनाच्या पोस्टनं उडाली खळबळ

सायना नेहवालनं नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. तिने इन्स्टाग्रामव आपल्या पतीसोबत फोटो शेअर केलाय. 

१३ जुलै रोजी, ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवालने तिच्या चाहत्यांना आणि चाहत्यांना धक्का दिला होता.

तिने तिचा पती आणि बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यपपासून वेगळे होण्याची घोषणा केली. 

क्रीडा विश्वात गेल्या वर्षभरात अनेक खेळाडूंचा संसार मोडलाय. त्यात आता सायना नेहवालची देखील भर पडली होती. 

मात्र सायना अन् कश्यप यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या काही आठवड्यातच एक मोठा ट्विस्ट आला. 

सायना नेहवालनं नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. तिने इन्स्टाग्रामव आपल्या पतीसोबत फोटो शेअर केलाय. 

या फोटोत हे दोघे एकत्र सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. या फोटोला सायनानं एक कॅप्शन देखील दिलं आहे. 

ती या पोस्टमध्ये म्हणते... कधीकधी अंतर हे तुम्हाला उपस्थितीचं महत्व शिकवून जातं. आम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करतोय.

सायनाची ही भावनिक पोस्ट सर्व काही सांगून जाते. हे बॅडमिंटन कोर्टवरचं अन् खऱ्या आयुष्यातलं जोडपं आपलं नात्याला पुन्हा एक संधी देऊन पाहतंय. 

आशा आहे की सायना आणि कश्यप यांची संसाराची गाडी पुन्हा एकदा रुळावर येईल अन् दोघं सुखा-समाधानानं नांदतील. 

Click Here