सई ताम्हणकरनं पॅराग्लायडिंगचे नवे फोटो केले शेअर 

पॅराग्लायडिंग पायलटसाठी घेतेय रीतसर प्रशिक्षण!

मराठीपासून ते हिंदीपर्यंत आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावणारी सई ताम्हणकर कायम नवनव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असते. 

आकाशावर मनापासून प्रेम करणारी सई आता चक्क आकाशाला गवसणी घालताना दिसतेय.

 नुकतंच सईनं एक इन्स्टा पोस्ट केली असून या पोस्टमध्ये तिनं अवकाशात झेप घेत असल्याचे फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये सई सोलो पॅराग्लायडिंग करताना दिसतेय.

सईच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट करत तिच्या साहसाचं कौतुक केलं आहे.

फक्त आवड म्हणून नाही तर प्रोफेशनल पॅराग्लायडिंग पायलट होण्यासाठी सई याचं खास शिक्षण घेत आहे.

कामशेत टेंपल पायलट स्कूलमधून ती पॅराग्लायडिंगचा कोर्स करत आहे.

आगामी काळात सई वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार असून मराठी-हिंदी अशा दोन्ही पडद्यावर ती दिसणार आहे

Click Here