तेंडुलकर ते रुट! कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणारे फलंदाज

जो रुटनं केली संगकाराची बरोबरी

कसोटीत सर्वाधिक धावांसह शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. १९८९ ते २००३ या कालावधीत त्याने ५१ शतके  झळकावली आहेत. 

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिस याने १९९५ ते २००३ या आपल्या कसोटी कारकिर्दीत १६६ सामन्यात ४५ शतके झळकावली आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने १९९५ ते २००२ या कालावधीत १६८ सामन्यात ४१ शतके झळकावली आहेत. 

२०१२ मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या इंग्लंडच्या जो रुटनं  १५७ व्या कसोटी सामन्यात कारकिर्दीतील ३८ व्या शतकाला गवसणी घातली. 

श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा याने २००० ते २०१५ या कालावधीत १३४ कसोटी सामन्यात ३८ शतके झळकावली आहेत. 

स्टीव्ह स्मिथ याने २०१० ते २०२५ या कालावधीत ११९ कसोटी सामन्यात ३६ शतके ठोकली आहेत. 

राहुल द्रविडनं १९९६ ते २०१२ या कालावधीत १६४ सामन्यात ३६ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.

Click Here