ऋतुराज ते देवदत्त! विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक शतके झळकवणारे ४ फलंदाज

पुणेकर बॅटर ठरला नंबर वन!

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋतुराज गायकवाड हा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या २०२५-२६ च्या हंगामात महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करत आहे.

देशांतर्गत क्रिकेटमधील  कामगिरीतील सातत्य कायम असल्याचे दाखवून देताना गोवा संघाविरुद्ध त्याने शतकी खेळीसह खास विक्रमाला गवसणी घातली. 

देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित वनडे स्पर्धेत सर्वाधिक शतके झकवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो संयुक्तरित्या अव्वलस्थानी विराजमान झाला आहे.

ऋतुराज गायकवाडनं गोवा संघाविरुद्ध विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील १५ वे शतक झळकावले आहे. 

या देशांतर्गत स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या अंकित बावने यानेही विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत १५ शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.

कर्नाटक संघाचे प्रतिनिधीत्व करणारा देवदत्त पडिक्कल याने यंदाच्या हंगामातील ४ शतकासह आतापर्यंत या स्पर्धेत १३ शतके झळकावली आहेत. 

कर्नाटक संघाचे नेतृत्व करणारा मयंक अग्रवाल याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत १३ शतके ठोकली आहेत.

Click Here