या स्टार खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यातील कसोटीसाठी टीम इंडियात संधी मिळणं मुश्किलच
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय 'अ' संघाची घोषणा झाली. पण या संघातील पाच जणांना कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात स्थान मिळणे मुश्किलच वाटते.
एक नजर टाकुयात त्या स्टार खेळाडूंवर ज्यांना अभिमन्य ईश्वरनच्या नेतृत्वाखाली खेळूनच माघारी परतावे लागेल.
भारत 'अ' संघातून खलील अहमद इंग्लंड दौऱ्यावर दिसेल. पण अर्शदीप सिंगसारखा पर्याय सोडून त्याची टीम इंडियात एन्ट्री होणं मुश्किल आहे.
मुंबईकर तुषार देशपांडेही भारत 'अ' संघापुरताच मर्यादित राहिल असे वाटते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत 'अ' संघाची कॅप्टन्सी करून ऋतुराजला टीम इंडियात जागा मिळाली नव्हती. आता तर त्याच्याकडून कॅप्टन्सीही नाही.
ईशान किशनसाठी बीसीसीआयने टीम इंडियाचे दरवाजे खुले केलेत. पण तोही इंग्लंड दौऱ्यावरील टेस्ट टीममध्ये आपले स्थान पक्के करू शकणार नाही.
रवींद्र जडेजासह अक्षर पटेल हे तगडे पर्याय असल्यामुळे भारतीय 'अ' संघातील स्पिनर मानव सुथारचीही टीम इंडियात एन्ट्री होणार नाही.