यादीत एकही भारतीय गोलंदाज नाही
T20 वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत कोलकाताच्या मैदानात वेस्ट इंडिजच्या रोमारियो शेफर्डनं स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात हॅटट्रिकचा डाव साधला.
तो या स्पर्धेत हॅटट्रिक घेणारा १० वा गोलंदाज ठरला.
टी-२० वर्ल्ड कप २००७ च्या पहिल्या हंगामात ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट लीनं या स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक घेतली होती.
२०२१ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आयर्लंडच्या कर्टिस कॅम्परनं अबू धाबीच्या मैदानात नेदरलँड्स विरुद्ध हॅटट्रिक साधली होती.
श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगा याने २०२१ च्या हंगामात शारजाहच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हॅटट्रिकचा पराक्रम केला होता.
२०२१ च्या हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो रबाडाने इंग्लंडविरुद्ध हॅटट्रिकची किमया साधली होती.
२०२२ च्या हंगामात संयुक्त अरब अमिरातीच्या कार्तिक मयप्पन याने श्रीलंकेविरुद्ध सलग तीन विकेट्स घेत सर्वांचे लक्षवेधून घेतले होते.
ऑयर्लंडच्या जोश लिट्ल याने न्यूझीलंडविरुद्ध अॅडलेडच्या मैदानात हॅटट्रिकचा डाव साधल्याचा रेकॉर्ड आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने २०२४ च्या हंगामात बांगलादेश आणि अफगाणिस्तानविरुद्ध दोन वेळा हॅटट्रिकसह इतिहास रचला होता.
२०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडच्या क्रिस जॉर्डनने अमेरिकेच्या संघाविरुद्ध हॅटट्रिक नोंदवली होती.