IPL Playoffs मध्ये सर्वाधिक धावा करणारे १० फलंदाज

 हिटमॅन रोहित शर्मानं साधला मोठा डाव

आयपीएलच्या प्लेऑफ्समध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मानं टॉप ५ मध्ये एन्ट्री मारलीये. 

या यादीत मिस्टर IPL स्पेशलिस्ट सुरेश रैना २४ सामन्यातील ७१४ धावांसह सर्वात आघाडीवर आहे. 

महेंद्रसिंह धोनी प्लेऑफ्समधील २८ सामन्यात ५२३ धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. 

शुबमन गिलनं ११ प्लेऑफ्स सामने खेळताना ४७४ धावा काढल्या आहेत. 

GT विरुद्धच्या सामन्याआधी रोहित शर्मा टॉप १० मध्येही नव्हता. पण ८१ धावांच्या खेळीसह तो २२ सामन्यातील ३९७ धावांसह चौथ्या स्थानावर पोहचलाय. 

फाफ ड्युप्लेसीनं प्लेऑफ्समधील १५ सामन्यात ३९० धावा काढल्याचा रेकॉर्ड आहे.

शेन वॉटसन याने प्लेऑफ्समध्ये १२ सामने खेळताना ३८९ धावा केल्या आहेत.

मायकेल हसी याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत ११ प्लेऑफ्सच्या लढतीत ३८९ धावा काढल्या आहेत.

मुरली विजय १० डावात ३६४ धावा, ड्वेन स्मिथ ११ डावात ३५१ धावा यांच्यानंतर १५ डावात ३४१ धावांसह कोहली या यादीत टॉप १० मध्ये आहे.

Click Here