आर. माधवनची बाॅलिवूड आणि साऊथमध्ये स्टार आहे. पण, या स्टारच्या मुलाची लाईफस्टाईल कशी आहे? हे माहितीये का तुम्हाला...
माधवनने बाॅलिवूडमध्ये आपला एक ठसा उमटवला आहे. पण, त्याचा मुलगा वेदांतने स्वबळावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
माधवनचा मुलगा वेदांत हा एक प्राेफेशनल स्विमर आहे. भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवण्याचे त्याचे स्वप्न आहे.
माधवनाच्या मुलाची लाईफस्टाईल ही अत्यंत शिस्तबद्ध आहे. स्विमर असल्याने त्याचा दिनक्रम वेगळा आहे.
वेदांतचा दिवस हा पहाटे ४ वाजता सुरू हाेताे. पहाटे उठायचे असल्यामुळे ताे रात्री ८ वाजता झाेपताे.
वेदांतची जेवण्यातही शिस्त दिसून येते. फक्त जेवायचे म्हणून ताे खात नाही. अन्न चावून नीट खाण्याकडे त्याचे लक्ष असते.
वेदांत स्विमर असल्याने ताे त्याच्या डाएटकडेही विशेष लक्ष देताे. संतुलित आहार घेणे हा नियमही ताे कटाक्षाने पाळताे.
वेदांतने मलेशिया ओपनमध्ये ५ वेळा सुवर्णपदक पटकावले आहे. शिस्तबद्ध लाईफस्टाईलसाठी वेदांतला ओळखले जाते.