आरजे महावशनं युजवेंद्र चहलसोबत साजरा केला वाढदिवस?
परदेशात केला धमाकेदार जल्लोष
भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची रुमर्ड गर्लफ्रेंड आरजे महावश सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली.
काल २७ ऑक्टोबर रोजी तिचा वाढदिवस साजरा झाला. बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ब्लू कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये ती सुंदर दिसत होती. हातात निळे बलून्स घेत आरजे महावशने पोज दिल्या. तिच्या फोटोंनी फॅन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.
तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "सबर, शुक्र, सुकून. मला खरं तर वाढदिवस अजिबात आवडत नाही. त्या दिवशी फोन स्विच ऑफ करून टाकते, कोणाकडूनही शुभेच्छा मिळू नये म्हणून".
तिने म्हटलं, "थोडी अस्वस्थाता जाणवते आणि हे का होतं तेही माहित नाही. म्हणूनच मी एकटी किंवा अगदी जवळच्या एक दोन मित्रांसोबत परदेशात निघून जाते".
पुढे ती म्हणाली, "या वर्षीचा वाढदिवस मात्र खास होता… पहिल्यांदा मला आयुष्यात शांतता, एक वेगळा आनंद जाणवला. आता पुढचं वर्ष देवाने माझ्यासाठी प्लॅन करावं".
"माझ्या आयुष्यात अधिक प्रेम, जागरुकता, शिकवण आणि कृतज्ञता येवो. मी प्रत्येक चढ-उतारासाठी तयार आहे", असंही तिने म्हटलं.
तिच्या बर्थडे पोस्टनंतर चर्चा रंगली की महावशने हा वाढदिवस रूमर्ड बॉयफ्रेंड युजवेंद्रसोबतच साजरा केला. पण, तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये चहल कुठेही दिसला नाही.