हिवाळ्यात वाढतो ब्लड शुगरचा धोका! 

आहार आणि व्यायामात 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी


हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांना रक्तातील साखरेच्या (ब्लड शुगर) प्रमाणात वाढ जाणवते. 

एक्सपर्ट्स सांगतात की तापमान कमी झाल्यावर शरीराचा मेटाबॉलिझम रेट घटतो, व्यायामाची सवय कमी होते, त्यामुळे रक्तातील ग्लूकोज वाढण्याची शक्यता निर्माण होते.

थंड हवेत शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता आणि त्याची गरज दोन्ही बदलतात, त्यामुळे डायबिटीज रुग्णांनी या काळात अधिक दक्ष राहणे आवश्यक आहे.

या काळात कमी कार्बोहायड्रेट असलेला आहार घ्या. फळे व हिरव्या भाज्यांचे प्रमाण वाढवा. तळलेले, गोड आणि जास्त तेलकट पदार्थ टाळा.

दररोज किमान अर्धा तास व्यायाम करा, थंडी असली तरी हालचाल आवश्यक आहे. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.


शुगर लेव्हलची नियमित तपासणी करा आणि वाढल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वारंवार लघवी होणे, जास्त तहान लागणे, वजन अचानक वाढणे किंवा घटणे, सतत थकवा किंवा सुस्ती जाणवणे याकडे दुर्लक्ष करू नका.

थंडीमुळे बाहेर जाणे शक्य नसल्यास, घरच्या घरीच हलका वर्कआउट, योगा किंवा ध्यान करा. यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि शुगर नियंत्रणात राहते.

Click Here