SENA देशांत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय विकेट किपर बॅटरच्या यादीत पोहचला अव्वलस्थानी
इंग्लंड विरुद्धच्या हेडिंग्ले कसोटी सामन्यात रिषभ पंतनं १६ व्या अर्धशतकासह कसोटीत ३००० धावांचा टप्पा पार करताना खास विक्रमाला गवसणी घातली.
SENA देशांत (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय विकेट किपर बॅटरच्या यादीत तो टॉपला पोहचलाय.
पंतनं धोनीचारेकॉर्ड मोडीत काढत नंबर वनवर कब्जा केलाय. इथं एक नजर सेना देशांत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय विकेट किपर बॅटरच्या रेकॉर्डवर
रिषभ पंतनं SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांत आतापर्यंत १७३४ धावा केल्या आहेत.
भारताचा माजी कर्णधार आणि विकेट किपर बॅटर महेंद्रसिंह धोनी १७३१ धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.
भारतीय विकेट किपर बॅटर फारुख इंजिनियर या दिग्गजाने सेना (SENA) देशांत १०९९ धावा केल्या आहेत.
सय्यद किरमाणी या यादीत ७८५ धावांसह चौथ्या क्रमांकावर आहेत.
SENA देशांत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय विकेट किपर बॅटरच्या यादीत किरण मोरे ६२७ धावांसह पाचव्या स्थानावर आहेत.