रिंकू सिंह की प्रिया सरोज, सर्वाधिक श्रीमंत कोण?

रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या नावे किती संपत्ती आहे? 

रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा पार पडला. रिंकू सिंह क्रिकेटपटू तर प्रिया सरोज या खासदार आहेत.

रिंकू सिंह आणि प्रिया सरोज दोन महत्त्वाच्या क्षेत्रात आहेत, त्यामुळे त्यांच्या नावे असलेल्या संपत्तीची चर्चा होणं साहजिक आहे. 

रिंकू सिंह बीसीसीआय, आयपीएल आणि जाहिराती या माध्यमातून पैसे कमावतो. तो पाच कंपन्यांच्या जाहिराती करतोय.

रिंकू सिंहची सध्याची कमाई १८ कोटी रुपये इतकी आहे. म्हणजे रिंक महिन्याला दीड कोटी कमावतो. त्याच्याकडे तीन कोटींपेक्षा अधिक किंमत असलेले घर आहे.

रिंकू सिंहकडे तीन एकर जमीन आहे आणि त्याने काही महागड्या गाड्याही खरेदी केल्या आहेत. त्यामुळे तो सध्या कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक आहे. 

खासदार असलेल्या प्रिया सरोज यांच्याकडे मात्र खूपच कमी संपत्ती आहे. मछलीशहरच्या खासदार प्रिया सरोज यांची एकूण संपत्ती आहे, ११.२५ लाख रुपये.

प्रिया सरोज यांच्या नावे घर आहे, ना कार. त्यांच्याकडे पाच ग्रॅम सोने आहे. त्यांचे वडील तुफानी सरोज यांच्याकडे मात्र, ६.५५ कोटींची संपत्ती आहे.

त्यामुळे रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्यात सर्वाधिक श्रीमंत कोण हे बघायचं झालं, तर रिंकूकडे १८ कोटींची संपत्ती आहे, तर प्रिया सरोज यांच्याकडे ११.२५ लाख.

Click Here