रिंकूने शेअर केले सुंदर फोटो
गुलाबी कुर्ती, गुलाबी लेगिंग्स अशा साध्या लूकमध्ये आर्ची म्हणजेच रिंकूने फोटो शेअर केलेत
ती नयनरम्य वातावरणाचा आनंद घेताना दिसत आहे
एका दगडावर बसून पोज देतानाचा तिचा फोटोही सुंदर आलाय. खाली संपूर्ण दरी दिसत आहे
तर उंचच उंच झाडांच्या गर्दीत रिंकू वाट शोधत चालताना दिसत आहे
या झाडांकडे पाहत हसतच ती पोज देत आहे
आयुष्यात थोडा बदल बरंच काही देऊन जातो असं कॅप्शन तिने लिहिलं आहे.
कमेंट्समध्ये अनेकांनी रिंकूच्या साधेपणाचं कौतुक केलं आहे. आजही रिंकूची आर्चीच्या भूमिकेतली क्रेझ कमी झालेली नाही.