रिंकू राजगुरु पारंपरिक पेहरावात कायमच खुलून दिसते
सणासुदीचे दिवस आहेत त्यामुळे अनेक सेलिब्रिटी सुंदर फोटोशूट पोस्ट करत आहेत
लाल नऊवारी, हातात हिरवा चुडा, नथ, बुगड्या, गळ्यात हार आणि कपाळी चंद्रकोर अशा पारंपरिक लूकमध्ये रिंकू नटली आहे
या लूकमध्ये तिने अगदी काळजाला भिडतील अशा पोज दिल्या आहेत. तिच्या ब्लाऊजवर खास नक्षीकामही केलेलं दिसत आहे
आरशात स्वत:चं सुंदर रुप न्याहाळतानाही ती दिसत आहे
तसंच अंधारात तुळशीच्या बाजूला उभा असलेला तिचा फोटो अप्रतिम आला आहे
जुन्या गाण्यांची आठवण करुन देणारं तिचं हे मनमोहक फोटोशूट आहे