टॉप ५ मध्ये भारताच्या दोघींचा नंबर
यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या आघाडीच्या ५ बॅटर्समध्ये दोन भारतीय छोरींचा समावेश आहे.
भारताच्या ताफ्यातील रिचा घोष हिने ५ सामन्यातील ५ डावात ८ षटकार मारले आहेत. ती यंदाच्या हंगामातील 'सिक्सर क्वीन'चा ताज मिरवताना दिसते.
दक्षिण आफ्रिकेच्या संघातील नेडीन डि क्लर्क हिने ५ सामन्यातील ३ डावात ६ षटकार मारले आहेत.
न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईन हिने ५ सामन्यातील ३ डावात ५ षटकार ठोकले आहेत.
श्रीलंकेची कर्णधार चामरी अटापट्टू ५ सामन्यातील ५ डावातील ५ षटकार मारत या यादीत चौथ्या स्थानावर आहे.
भारतीय संघाची उप कर्णधार आणि वनडेतील 'क्वीन' स्मृती मानधना हिने ५ सामन्यातील ५ डावात ४ षटकार मारले आहेत.