फाटे फुटलेल्या केसांवर लावा 'हे' पाणी, वारंवार ट्रिम करण्याची गरज नाही...   

केसांना फाटे फुटल्याने सारखे कापावे लागतात? फाटे फुटण्याच्या समस्येवर 'हे' घरगुती पाणी आहे रामबाण उपाय!

केसांना फाटे फुटल्याने ते वारंवार कापावे लागतात, अशावेळी घरगुती उपाय म्हणून केसांना लावा हे जादुई पाणी... 

केसांना फाटे फुटल्यामुळे केसांची वाढ थांबते आणि ते निर्जीव दिसू लागतात. वारंवार ट्रिमिंग करूनही ही समस्या सुटत नाही.

तांदळाच्या पाण्यात 'इनोसिटॉल' नावाचे कार्बोहायड्रेट असते, जे खराब झालेल्या केसांना आतून दुरुस्त करण्याचे काम करते.

अर्धी वाटी तांदूळ धुवून दोन वाटी पाण्यात २० ते ३० मिनिटे भिजत ठेवा किंवा तांदूळ शिजवून त्याचे 'पेज' वेगळी काढून घ्या.

केस शाम्पूने धुतल्यानंतर, स्काल्पपासून केसांच्या टोकांपर्यंत जिथे फाटे फुटले आहेत तिथे हे पाणी लावा.

५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर १० ते १५ मिनिटे केस तसेच राहू द्या.

शेवटी कोमट किंवा साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनदा हा उपाय केल्यास फरक जाणवेल.

तांदळाच्या पाण्यातील अमिनो ॲसिड्समुळे केसांचा पोत सुधारतो आणि फाटे फुटणे थांबते.

Click Here