आता पकडली जाणार फसवणाऱ्या पार्टनरची चोरी
सध्याच्या काळात ब्रेकअप-पॅचअप या गोष्टी खूप कॉमन झाल्या आहेत. त्यामुळे अनेकदा तरुणाईमध्ये अफेअर, रिलेशनशीपच्या चर्चा रंगतात.
काही तरुण वा तरुणी एकाच वेळी डबल डेटही करत असतात. त्यामुळेच सध्या रिलेशनशीपमध्ये फसवणुकीचा Micro-Cheating हा प्रकार समोर आला आहे.
तुमचा पार्टनर जर तुमच्यासोबत Micro-Cheating करत असेल तर ते कसं ओळखावं हे जाणून घेऊयात.
तुमचा जोडीदार जर त्याच्या एक्सविषयी सतत बोलत असेल किंवा त्यांच्यासोबत तुमची तुलना करत असेल तर त्याला Micro-Cheating असं म्हटलं जातं.
तुमचा पार्टनर तुमच्यापासून लपवून कोणाशी बोलत असेल तर हे Micro-Cheating चं लक्षण आहे.
तुमच्याकडे दुर्लक्ष करुन सतत मोबाईलमध्ये पाहणं, सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ वावरणं हे सुद्धा तुम्हाला फसवण्याचं लक्षण आहे.
तुमचा पार्टनर प्रत्येक लहान गोष्टीत कारणं देत असेल किंवा तुमच्याशी खोट बोलत असेल तर वेळीच सावध व्हा.