आता Gen Z नीं असाच एक नवा डेटिंग फंडा काढलाय
रिलेशनशिप असो वा कॉर्पोरेट जॉब्स... Gen Z नेहमीच चर्चेचा विषय ठरत आहेत.
Gen Z चे रिलेशनशिप फंडे इतके कॉम्प्लिकेटेड असतात की ते सर्व फंडे मिलेनियल्स अन् बूमर्सच्या डोक्याला शॉट्स ठरतात.
आता Gen Z नीं असाच एक नवा डेटिंग फंडा काढलाय... तसं बघायला गेलं तर तसा तो जरा ओल्ड स्कूलच आहे म्हणा...
Gen Z अर्थात जनरेशन झेड यांच्यात सध्या हार्डबॉलिंग हा नवा डेटिंगचा विषय सध्या ट्रेंडिंग आहे.
तुम्ही म्हणाल की हे सिच्युएशनशिप, घोस्टिंग असले डेटिंगचे प्रकार आता कुठं जरा जरा कळू लागले होते त्यात आता हा हार्डबॉलिंगचा नवा विषय काय...?
चला तर मग जाणून घेऊयात हा डेटिंगचा नवा विषय... हार्डबॉलिंग !
तर हार्डबॉलिंग डेटिंगमध्ये खोटं वागणं किंवा हातचं राखून असं काही नसतं. म्हणजे सीधी बात नो बकवास अशा टाईपचं हे डेटिंग असतं.
तुम्ही जे काही आहे ते स्पष्टपणे समोरच्या व्यक्तीला सांगून टाकता. म्हणजे मी सिच्युएशनशिपच्या दृष्टीकोणातून बघत नाहीये वगेरे वगेरे...
या डेटिंगमध्ये तुम्ही या रिलेशनशिपबद्दल काय वाटतं, तुमचा नेमका उद्येश काय आहे ते स्पष्ट सांगता. यामुळे फिगर आऊट करण्यासाठी वेळ वाया जात नाही.
आता तुम्ही म्हणाल काय राव आरून फिरून गंगावेसेतच आलाय.... याला हार्डबॉलिंग नाही तर प्रामाणिकपणा म्हणतात!