लग्नापूर्वी एकमेकांना समजून घेणाऱ्या या जोड्या लग्नानंतर का बदलतात यामागची काही कारणं पाहुयात.
सध्याच्या काळात अनेक जोडप्यांमध्ये तक्रार असते ती म्हणजे लग्नानंतर नात्यातील प्रेम कमी होतं.
लग्नानंतर जोडीदारावरील जबाबदाऱ्या वाढतात. त्यामुळे घरातील गरजा पूर्ण करण्याच्या नादात एकमेकांना दिला जाणारा वेळ कमी होतो.
दररोज तेच ते रुटीन असल्यामुळे एकमेकांशी बोलायला पूर्वीसारखा वेळ मिळत नाही.
पूर्वी होणाऱ्या रोमॅण्टिक गप्पांची जागा हिशोब, किराणा सामान हे घेतात.