भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पाहून त्यांच्यापासून वाचण्यासाठी अनेक जण उपाययोजना करतात.
गेल्या काही काळात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पाहून त्यांच्यापासून वाचण्यासाठी अनेक जण उपाययोजना करतात. यामध्येच अनेकजण घराबाहेर लाल रंगाचे पाणी ठेवतात.
हे लाल रंगाचं पाणी पाहून कुत्रे घाबरतात व पळून जातात असं म्हटलं जातं. परंतु, या दाव्यामागचं तथ्य जाणून घेऊयात.
कुत्रे हे प्रत्यक्षात रंगांधळे असतात. ते मनुष्याप्रमाणे रंग पाहू शकत नाहीत. ते फक्त तीन रंग पाहू शकतात. हे तीन रंग म्हणजे निळा, पिवळा आणि तपकिरी.
कुत्र्यांना लाल रंग अजिबात दिसत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर तुम्ही कितीही लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवल्या तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही.