बदलती जीवनशैली आणि चुकीची आहारपद्धती यांचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
गेल्या काही वर्षांमध्ये मधुमेह आणि हार्ट अटॅक या दोन समस्यांचं प्रमाण चांगलंच वाढलं आहे. यात खासकरुन तरुणांमध्ये या समस्या दिसून येत आहेत.
तरुणांमध्ये हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण लक्षणीय वाढलं असून त्यामागची कारणं कोणती ते पाहुयात.
अनेकदा अतिचिंता केल्यामुळेदेखील हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
तंबाखूजन्य पदार्थ आणि धूम्रपान यांमुळे धमन्यांमध्ये चरबी साचते आणि तरुणांमध्ये हृदय विकाराचा धोका वाढतो.
अपूर्ण झोप, व्यायामाचा अभाव, मोठ्या प्रमाणात चरबीयुक्त पदार्थांचे सेवन, आरोग्याकडे दुर्लक्ष यांसारख्या गोष्टीही हृदयविकारास कारणीभूत ठरतात.
हृदयाला होणारा रक्तपुरवठा थांबल्यानंतर हृदयविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. काहींना सकाळी ६-१० या वेळेत हृदय विकाराचा झटका येतो आणि त्यामागे वेगवेगळी कारणे आहेत.